मुलांच्या आंतरिक क्षमतांवर विश्वास टाकणारी, शिक्षण जीवनस्पर्शी करू पाहणारी, जीवनाभिमुख शिक्षण देणारी, आनंददायी, पुण्यातील मराठी माध्यमाची एक प्रयोगशील शाळा.
संविधानातील मूल्यंं, सर्वसमावेशकता, स्पर्धेपेक्षा सहकार्य, पर्यावरणीय दृष्टिकोन, यावर आमचा दृढ विश्वास आहे.
आनंदी विद्यार्थी
सकारात्मक रेटिंग
कुशल शिक्षक
उत्कृष्ट सुविधा
उत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधाउत्कृष्ट सुविधा
अक्षरनंदनमध्ये डोकावलंत तर मुलांच्या विविध कलाकृतींंनी चित्रित झालेले फलक तुमचं स्वागत करतील. तुम्ही याल त्यादिवशी असं काही दृश्य असेल.
मुलांचे लेखन, एखादी कविता ऐकून काढलेली चित्रं, घडीकामाचे नमुने, अपूर्णांक समजण्यासाठी काढलेली चित्रं, मैत्री विषयावरील कात्रणं, कविता इथल्या भिंतींना चैतन्य आणतात. क्रॉस-स्टिचचे टाके मिरवणारी पाकिटे, टेकडीवरून बघितलेल्या घरांची रेखाचित्रंं, पावसात भिजल्याचं वर्णन, परिसर फिरून काढलेले नकाशे, नुकतेच रंगवलेले बांधणीचे रुमाल... भिंतीवर प्रत्येकाचं काही ना काही झळकत असतं.
मुलांचे लेखन, एखादी कविता ऐकून काढलेली चित्रं, घडीकामाचे नमुने, अपूर्णांक समजण्यासाठी काढलेली चित्रं, मैत्री विषयावरील कात्रणं, कविता इथल्या भिंतींना चैतन्य आणतात. क्रॉस-स्टिचचे टाके मिरवणारी पाकिटे, टेकडीवरून बघितलेल्या घरांची रेखाचित्र, पावसात भिजल्याचं वर्णन, परिसर फिरून काढलेले नकाशे, नुकतेच रंगवलेले बांधणीचे रुमाल... भिंतीवर प्रत्येकाचं काही ना काही झळकत असतं.
वर्तमानपत्रातील हुंडाबळींची बातमी वाचून स्त्री-पुरुष समानतेवर दहावीच्या वर्गात जोरदार चर्चा चालली आहे. घरी व शाळेत मिळणारे स्वातंत्र्य आणि त्याबरोबर येणारी जबाबदारी याबद्दल हिरीरीने मुद्दे मांडत आहेत पाचवीची मुले...
उत्खनन आणि त्यातून मिळणारी पुरातत्वे साधने याबद्दल सहावीच्या मुलांनी डेक्कन कॉलेजला जाऊन माहिती घेतली आहे. आज अश्मयुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू मुलं माती कामातून बनवत आहेत.
दुसरीच्या वर्गात शाडूच्या मातीपासून गणपतीच्या विविध मूर्ती बनवत आहेत. दुर्वा, फुले, उंदीरही मातीचेच तयार होत होत आहेत.
खोळ शिवून तयार झालीये, आता सातवीची मुलं कापूस मोजून घेऊन छोटीशी उशी करत आहेत.
सर्वे नंबर 103, शिवाजी हाउसिंग सोसायटी, सेनापती बापट मार्ग, पुणे - 411016.
प्राथमिक शाळा : 020-25632224
माध्यमिक शाळा : 020-25637513
अक्षरनंदन मोबाईल: +91 9421976079