अक्षरनंदनमध्ये अन्यथा डोकावलंत तर मुलांच्या विविध कलाकृतीनी चित्रित झालेले फलक तुमचं स्वागत करतील.
तुम्ही याल त्यादिवशी असं काही दृश्य असेल.

बोलक्या भिंती

मुलांचे लेखन, एखादी कविता ऐकून काढलेली चित्रं, घडीकामाचे नमुने, अपूर्णांक समजण्यासाठी काढलेली चित्रं, मैत्री विषयावरील कात्रणं, कविता इथल्या भिंतींमध्ये चैतन्य आणतात. क्रॉस-स्टिचचे टाके मिरवणारी पाकिटे, टेकडीवरून बघितलेल्या घरांची रेखाचित्रंं, पावसात भिजल्याचं वर्णन, परिसर फिरून काढलेले नकाशे, नुकतेच रंगवलेले बांधणीचे रुमाल... भिंतीवर प्रत्येकाचं काही ना काही झळकत असतं.




समृद्ध मराठी

नववीच्या मुलांनी 'समाज समजून घेताना' या उपक्रमात समाजातील उपेक्षित गटातील व्यक्तिचित्रांचा अभ्यास केला आहे. त्याला जोडून 'कचराकोंडी' हा माहितीपट मुलं बघत आहेत.

सातवीच्या मुलांनी आपल्या आवडीच्या कविता शोधून नीट समजून घेतल्या. आज संगीत कक्षात पालक व शिक्षकांसमोर त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आहे.


धड्यातील प्रत्यक्षात collage

धड्यातील प्रत्यक्षात

उत्खनन आणि त्यातून मिळणारी पुरातत्व साधने याबद्दल सहावीच्या मुलांनी डेक्कन कॉलेजला जाऊन माहिती घेतली आहे. आज अश्मयुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू मुलं मातीकामातून बनवत आहेत.






हिंदी इंग्रजीची ओळख बालवर्गापासूनच

हिंदी दिनानिमित्त सादर होणाऱ्या कार्यक्रमात दुसरी तिसरीची मुलं एकमेकांना पहेलिया घालतायत.





अंतर्मुख होताना

आपल्या सर्वांचं भरणपोषण करणाऱ्या पृथ्वीविषयीची आजची प्रार्थना बंगालीत होती. प्रार्थना झाल्यानंतर सर्व मुलं शांत डोळे मिटून बसली आहेत.




लोकशाही मूल्य रुजवताना

आज मैदानावरची जागा वापरण्यावरून दोन वर्गात जोरदार वादावादी झाली. मुलांचे प्रतिनिधी, आता हा प्रश्न सामंजस्याने कसा सोडवता येईल यावर चर्चा करत आहेत.





निर्मितीचा आनंद collage

निर्मितीचा आनंद

तिसरीची मुलं जुन्या चादरीचा पुनर्वापर करून कापडी पिशव्या शिवायला शिकत आहेत.

दुसरीच्या वर्गात मुलांनी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या विविध मूर्ती बनवल्या आहेत. दुर्वा, फुले, उंदीरही मातीचेच तयार होत आहेत.




श्रमातून सर्जन

ठोकाठोकीचे आवाज येत आहेत, आठवीच्या वर्षभर चालणाऱ्या कार्यशाळेतून. एक गट लाकडी स्टुलं, बालवाडीसाठी लाकडी विटा, लाकडी पॅॅड तयार करत आहेत तर दुसरा गट टॉर्च, नाईट लॅम्प, दिवाळीच्या माळा करण्यात गर्क आहे.

श्रमातून सर्जन collage

इंग्रजीची खिडकी

नुकत्याच लिहित्या-वाचत्या झालेल्या तिसरीच्या मुलांनी इंग्रजी पुस्तिका बनवल्या आहेत. सहावीची मुलं इंग्रजी पुस्तकाचे परीक्षण लिहीत आहेत. तर गटात तयार केलेल्या इंग्रजी वर्तमानपत्राचे सादरीकरण नववीच्या वर्गात चालू आहे.




रंगलेल्या चर्चा

वर्तमानपत्रातील कौटुंबिक हिंसाचाराची बातमी वाचून स्त्री-पुरुष समानतेवर दहावीच्या वर्गात जोरदार चर्चा चालली आहे.

घरी व शाळेत मिळणारे स्वातंत्र्य आणि त्याबरोबर येणारी जबाबदारी याबद्दल हिरीरीने मुद्दे मांडत आहेत पाचवीची मुले.



संशोधन करताना collage

संशोधन करताना

पहिलीची मुलं भिंगातून वेगवेगळ्या पोताच्या कापडांचे निरीक्षण करत आहेत.

पूर्ण दिवसाच्या कार्यशाळेत आठवीची मुलं बासरी बनवताना ध्वनीचे विज्ञान समजून घेत आहेत.


मातीत हात घालताना

कुंड्यांमध्ये बटणंं, पेन्सिल आणि मेथीचंं बी पेरलं होतं. त्यांचं काय काय झालंय याचा शोध बालवाडीची मुलं घेत आहेत.

गुडघा गुडघा चिखलात ओणवं होऊन भाताची रोप लावायला नववीची मुलं शेतावर गेली आहेत .



बोलक्या भिंती

मुलांचे लेखन, एखादी कविता ऐकून काढलेली चित्रं, घडीकामाचे नमुने, अपूर्णांक समजण्यासाठी काढलेली चित्रं, मैत्री विषयावरील कात्रणं कविता इथल्या भिंतींना चैतन्य आणतात. क्रॉस स्टिचचे टाके मिळवणारी पाकिटे, टेकडीवरून बघितलेल्या घरांची रेखाचित्रंं, पावसात भिजल्याच वर्णन, परिसर फिरून काढलेले त्यांचे नकाशे, नुकतेच रंगवलेले बांधणीचे रुमाल... भिंतीवर प्रत्येकाचं काही ना काही झळकत असतं.

समृद्ध मराठी

समृद्ध मराठी सहावीच्या मुलांनी आपल्या आवडीच्या कविता शोधून नीट समजून घेतल्या. आज संगीत कक्षात पालक व शिक्षकांसमोर त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आहे.

नववीच्या मुलांनी समाज समजून घेताना या उपक्रमात समाजातील अपेक्षित गटातील व्यक्तिचित्रांचा अभ्यास केला आहे त्याला जोडून कचराकुंडी हा माहितीपट मुलं बघत आहेत.

धड्यातील प्रत्यक्षात

उत्खनन आणि त्यातून मिळणारी पुरातत्वे साधने याबद्दल सहावीच्या मुलांनी डेक्कन कॉलेजला जाऊन माहिती घेतली आहे. आज अश्मयुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू मुलं माती कामातून बनवत आहेत.

बोलक्या भिंती

मुलांचे लेखन, एखादी कविता ऐकून काढलेली चित्रं, घडीकामाचे नमुने, अपूर्णांक समजण्यासाठी काढलेली चित्रं, मैत्री विषयावरील कात्रणं कविता इथल्या भिंतींना चैतन्य आणतात. क्रॉस स्टिचचे टाके मिळवणारी पाकिटे, टेकडीवरून बघितलेल्या घरांची रेखाचित्रंं, पावसात भिजल्याच वर्णन, परिसर फिरून काढलेले त्यांचे नकाशे, नुकतेच रंगवलेले बांधणीचे रुमाल... भिंतीवर प्रत्येकाचं काही ना काही झळकत असतं.

समृद्ध मराठी

समृद्ध मराठी सहावीच्या मुलांनी आपल्या आवडीच्या कविता शोधून नीट समजून घेतल्या. आज संगीत कक्षात पालक व शिक्षकांसमोर त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम आहे.

नववीच्या मुलांनी समाज समजून घेताना या उपक्रमात समाजातील अपेक्षित गटातील व्यक्तिचित्रांचा अभ्यास केला आहे त्याला जोडून कचराकुंडी हा माहितीपट मुलं बघत आहेत.

धड्यातील प्रत्यक्षात

उत्खनन आणि त्यातून मिळणारी पुरातत्वे साधने याबद्दल सहावीच्या मुलांनी डेक्कन कॉलेजला जाऊन माहिती घेतली आहे. आज अश्मयुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू मुलं माती कामातून बनवत आहेत.

हिंदी इंग्रजी ची ओळख बालवर्गापासूनच

हिंदी दिनानिमित्त सादर होणाऱ्या कार्यक्रमात दुसरी तिसरीची मुलं एकमेकांना पहेलिया घालतायत.

अंतर्मुख होताना

आपल्या सर्वांचं भरणपोषण करणाऱ्या पृथ्वी विषयीची प्रार्थना झाल्यानंतर आज प्रार्थना बंगालीत होती. सर्व मुलं शांत डोळे मिटून बसली होती.

लोकशाही मूल्य रुजवताना

मैदानावरची जागा वापरण्यावरून दोन वर्गात जोरदार वादावादी चालू आहे. मुलांचे प्रतिनिधी आता हा प्रश्न सामंजस्याने कसा सोडवता येईल यावर चर्चा करत आहे.

निर्मितीचा आनंद

दुसरीच्या वर्गात शाडूच्या मातीपासून गणपतीच्या विविध मूर्ती बनवत आहेत. दुर्वा, फुले, उंदीरही मातीचेच तयार होत होत आहेत.
खोळ शिवून तयार झालीये, आता सातवीची मुलं कापूस मोजून घेऊन छोटीशी उशी करत आहेत.

श्रमातून सर्जन

ठोकाठोकीचे आवाज येत आहेत, आठवीच्या वर्षभर चालणाऱ्या कार्यशाळेतून... एक गट लाकडी स्कूल, बालवाडीसाठी लाकडी विटा तयार करत आहेत तर दुसरा टॉर्च, नाईट लॅम्प, दिवाळीच्या माळा करण्यात गर्क आहे.

इंग्रजीची खिडकी

नुकत्याच लिहित्या-वाचत्या झालेल्या तिसरीच्या मुलांनी इंग्रजी पुस्तिका बनवल्या आहेत. सहावीची मुलं इंग्रजी पुस्तकाचे परीक्षण लिहीत आहेत तर गटात तयार केलेल्या इंग्रजी वर्तमानपत्राचे सादरीकरण नववीच्या वर्गात चालू आहे.

रंगलेल्या चर्चा

वर्तमानपत्रातील हुंडाबळींची बातमी वाचून स्त्री-पुरुष समानतेवर दहावीच्या वर्गात जोरदार चर्चा चालली आहे. घरी व शाळेत मिळणारे स्वातंत्र्य आणि त्याबरोबर येणारी जबाबदारी याबद्दल हिरीरीने मुद्दे मांडत आहेत पाचवीची मुले.

10.

संशोधन करताना

पहिलीची मुलं भिंगातून वेगवेगळ्या पोताच्या कापडाच्या नमुन्यांचे निरीक्षण करत आहेत. पूर्ण दिवसाच्या कार्यशाळेत आठवीची मुलं बासरी बनवताना ध्वनीच्या विज्ञान समजून घेत आहेत.

11.

मातीत हात घालताना

कुंड्यांमध्ये बटण, पेन्सिल आणि घेवड्याचं बी पेरलं होतं. त्यांचं काय काय झालंय याचा शोध बालवाडीची मुलं घेत आहेत. गुडघा गुडघा चिखलात ओणव होऊन भाताची रोप लावायला नववीची मुलं शेतावर गेली आहेत

12.