७ वी पाताळेश्वर सहल २०२५

इयत्ता ७वीच्या मुलांसोबत पाताळेश्वराचे मंदिर बघणे हा एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव होता. 

श्री. सचिन दीक्षित यांच्यासोबत ७वीच्या मुलांनी पाताळेश्वराचे मंदिर निरीक्षणाचे खेळ खेळत, मजा घेत बघितले.
मंदिर बघताना आधी त्याचा काळ, कोणाच्या काळात ते बांधले गेले, बांधण्याची पद्धत ह्या गोष्टी सचिन दादांनी मुलांना समजावून सांगितल्या. 

मग प्रत्यक्ष मंदिर बघताना मुलांना थोडी माहिती देणं, मग मधे मध्ये त्यांनी मंदिरात कोणकोणत्या प्रकारचे खेळ आहेत, ते शोधून या. 

कोणाकोणाच्या मूर्ती आहेत? कोणकोणत्या प्रकारचे नक्षीकाम आहे? अशा छोट्या छोट्या कृती मुलांना करायला सांगितल्या. 

अशा प्रकारे मंदिर दाखवल्याने मुलांचा मंदिर बघण्याचा उत्साह तर टिकलाच; पण त्याचबरोबर त्यांना अनेक चांगले प्रश्नसुद्धा पडले. 

त्याची उत्तर सचिनदादांनी समजावून सांगितली.
तासाभराच्या या उपक्रमात मुलांना एखादी ऐतिहासिक वास्तू बघण्याचा एक चांगला अनुभव मिळाला.