संमेलन २०२५ - २०२६

संमेलन: बालवाडी ते दुसरी

डिसेंबर २०२५ मध्ये अक्षरनंदन शाळेची संध्याकाळ बालवाडी ते दुसरीतील बालचमूंच्या रंगतदार सादरीकरणाने उजळून निघाली. यंदाच्या संमेलनाचा विषय होता “आभाळ असे हे आमुचे”. विषयाला धरून गाणी, नृत्य, नाटक असे विविध कार्यक्रम सादर केले. सर्वच मुलांनी संमेलनात उत्साहाने सहभाग घेतला.

संमेलन: तिसरी ते सहावी

‘उत्सव विविधतेचा’ या विषयावर सादर करण्यात आलेले संमेलन यंदा चांगलेच गाजले. भारताचे भाषिक, सामाजिक वैविध्य आणि त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात घेऊन नृत्य, नाटय आणि कविता यांच्या माध्यमातून केलेली मांडणी बघताना पालक हरखून गेले.. मुलांनी मनापासून केलेले सादरीकरण संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. त्याची क्षणचित्रे..

बालवाडी ते दुसरी 

तिसरी ते सहावी