शाळेचे वाचनालय आणि पुस्तकांमध्ये रमलेली मुलं

वाचनालयाच्या तासाव्यतिरिक्त मुलं आवर्जून पुस्तके पाहायला, वाचायला वाचन कक्षात येतात.
वाचनालय ही केवळ पुस्तके ठेवण्याची जागा नाही तर वेगवेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारी जागा असायला हवी. हा शाळेचा मुख्य विचार आहे.मुलांना निवांत पडून गोष्टी वाचता यायला हव्यात.. वाचनालय खोलीत भरपूर उजेड असावा. मोकळी जागा असावी.. विषयाला धरून केलेली पुस्तकांची मांडणी मुलांना वाचायला उदयुक्त करते. शाळेच्या वाचनालयातील काही निवांत क्षण!