वादविवाद स्पर्धा

गेली चार वर्ष शाळेकडून राबवण्यात येणारा सर्वात लोकप्रिय प्रकल्प म्हणजे वादविवाद स्पर्धा!! दिड ते दोन महिने चालणाऱ्या या प्रकल्पामध्ये मुलांना ‘वादविवाद’ प्रक्रियेच्या सर्व बाजू उलगडून दाखवल्या गेल्या. या स्पर्धेच्या तयारी दरम्यान मुलांना यातील गुंतागुंत समजली. भांडणं आणि वाद विवाद यातला फरक समजून घेणे असेल, वेगवेगळ्या देशात वाद विवादाकडे कसे बघितले जाते याचा अभ्यास असेल अशा वेगवेगळ्या टप्प्यातून मुलांनी ही प्रक्रिया अनुभवली. आपला मुद्दा अभ्यासपूर्ण असावा आणि कोणताही आक्रमक भाव न आणता शांतपणे मांडता येईल का हे मुलांनी करून पाहिले.