माध्यमिक शाळेतील विद्यार्थी गटांसाठी चा एक महत्वाचा उपक्रम!! वयाच्या या टप्प्यावर वेगवेगळे विषय हाताळून मुलांनी व्यक्त व्हावे, गटाबरोबर एकत्र येऊन काम करावे, एका विषयाला धरून खोलात वाचन करावे आणि वेगवेगळ्या अभिव्यक्ती वापरून व्यक्त व्हावे हा या मागचा मुख्य विचार आहे. यावर्षीच्या स्पर्धेत मुलांनी ओळख, युद्ध, जंगल आणि पाठलाग या विषयांवर मांडणी केली. त्याची काही क्षणचित्रे पाहू शकता!!