लोकशाहीची ओळख प्रत्यक्ष अनुभवातून व्हावी, यासाठी इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी वर्ग प्रतिनिधी निवडणूक घेण्यात येते. उमेदवारी अर्ज, प्रचार, मतदान आणि मतमोजणी या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधींवर वर्गातील शिस्त, स्वच्छता, सहकार्याची भावना आणि अक्षरनंदन परिसराची जबाबदारी सोपवली जाते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांविषयी आदर निर्माण होतो. पुस्तकांमधून शिकलेल्या लोकशाहीची प्रत्यक्ष अनुभूती देणारा हा विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.