या विषयाला धरून पालकांच्या मनात अनेक शंका होत्या. शाळेत या विषयाला धरून काय शिकवले जाते आणि घरी याबाबत मुलांशी काय बोलावे, कसे सांगावे याबाबत पालकांच्या मनात बरेच प्रश्न होते. या शंकांचे निरसन करण्यासाठी हे सत्र आयोजित करण्यात आले होते.
शाळेत प्रयास संस्थेतर्फे आखलेल्या विशेष अभ्यासक्रमाची माहिती लारा ताई आणि मनीषा ताई यांनी पालकांना दिली. या अभ्यासक्रमात कोणत्या विषयांचा समावेश आहे, ते मुलांपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचवले जातात आणि मुलांच्या प्रश्नांना व शंकांना संवेदनशीलतेने, सहजतेने व योग्य प्रकारे कसे हाताळले जाते याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
हे सत्र अत्यंत मोकळ्या वातावरणात पार पडले. पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या शंका मांडल्या. त्यांना समर्पक उत्तरे मिळाल्यामुळे विषयाबद्दल अधिक स्पष्टता आणि आत्मविश्वास निर्माण झाला. मुलांच्या भावनिक व शारीरिक विकासाच्या टप्प्यांवर त्यांच्याशी योग्य संवाद साधण्यासाठी हे सत्र पालकांना निश्चितच उपयुक्त ठरले.
