वर्ग सजावट

सातवी ते दहावीच्या वार्षिक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे वर्ग सजावट स्पर्धा.
यंदाच्या वर्षी शनिवारी, दिनांक २० जुलै रोजी ही स्पर्धा पार पडली. यामध्ये मुलांनी आपल्या वर्गासाठी आधी विषय निवडून त्यानुसार दिलेल्या कालावधीत वर्गाची सजावट करायची असते.
यावर्षी संगीत, रस्ता, रात्र आणि बी हे विषय अनुक्रमे सातवी, आठवी, नववी आणि दहावी यांनी निवडले होते. या निवडलेल्या विषयांचा अनेक अंगांनी विचार करून व वर्गाचा अवकाश लक्षात घेऊन मांडणी केली होती.
वैभव अबनावे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक नववी आणि द्वितीय क्रमांक दहावीने मिळवला.