अक्षरनंदन शाळेतर्फे बाहेरील शाळांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याची सुरुवात
यावर्षी (2024) शाळेला 32 वर्षे पूर्ण झाली. शाळेच्या अध्यापन पद्धती, इतर शाळेतील शिक्षकांपर्यंत पोचाव्यात यासाठी यावर्षीपासून अक्षरनंदनतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यास सुरुवात झाली. 1989 साली ना. ग. नारळकर फाउंडेशनची स्थापना झाली. शिक्षकांसाठी विविध विषयांची प्रशिक्षण शिबिरे घेण्याने फाउंडेशनची सुरुवात झाली होती. या कार्यशाळेच्या निमित्ताने एक आवर्तन पूर्ण झाले, याचा आनंद होत आहे.
19 फेब्रुवारीला मराठी व 24 फेब्रुवारीला इंग्रजी या विषयांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या. मराठी – मराठी शिकवताना साहित्याचा वापर का व कसा ? इंग्रजी – मराठी शाळेत इंग्रजी शिकवताना…. असे या प्रशिक्षणाचे विषय होते. पुण्यातील व पुण्याबाहेरील शिक्षक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले. तसेच काही एनजीओचे प्रशिक्षक व मुख्याध्यापकदेखील या कार्यशाळेला उपस्थित होते. दोन्ही कार्यशाळांना शिक्षकांचा प्रतिसाद उत्साहपूर्ण होता.