शिक्षक दिन २०२४

शिक्षक दिन कार्यक्रम (५-०९-२४)

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘जीवनशैली आणि व्यायाम’ या विषयावर शिक्षकांशी बोलण्यासाठी डॉक्टर प्रमोद पाटील यांना शाळेने आमंत्रित केले होते. कोणत्याही दुखण्यातून बाहेर पडतानाचा दृष्टिकोन, दुखण्याचे कारण आणि निमित्त, व्यायामाची गरज याविषयी डाॅ. पाटील यांनी सविस्तरपणे आपले विचार मांडले. सद्य जीवनशैलीमुळे आपल्या हालचालींवर आलेली मर्यादा, त्यामुळे येत असलेल्या अडचणी याविषयी बोलून त्यांनी व्यायाम हाच त्याच्यावरचा उपाय असे सांगितले. व्याख्यानाची सांगता प्रश्न उत्तरांनी झाली.