4 जानेवारी 2025 रोजी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली. आपले पालक शीतल साठे, सचिन माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरील गाणी, पोवाडे, ओव्या व अखंड सादर केले. शब्दरचना, आशय आणि शीतलताईंचा आवाज सगळंच मनाला भिडणारं होतं.
हा कार्यक्रम ऐकणारी आपली मुलं नेमक्या जागा पकडून उत्स्फूर्तपणे टाळ्यांनी साथ देत होती. एक वेगळाच माहोल तयार झाला होता.
विविध अर्थांनी सुंदर असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद शाळेतील मुलांसमवेत शिक्षकांनीही घेतला.