सहभाग

मूल्यांची बांधिलकी राखत पुढील वाटचालीसाठी गरज आहे डोळस व्यक्तींची व भक्कम आर्थिक पाया तयार करण्याची!

  • दत्तक पालक योजना

    शाळेत सर्व सामाजिक, आर्थिक गटातील मुलांना एकत्र शिकता यावे यासाठी काही पालकांना शुल्कात सूट दिली जाते. आरक्षणातून प्रवेश झालेल्या पालकांना शासनाच्या नियमानुसार मोफत शिक्षण दिले जाते. त्याचा परतावा शासनाकडून मिळत नाही. निम्न आर्थिक-सामाजिक गटातील एका विद्यार्थ्याचे एका वर्षाचे पालकत्व रु.35000/-

  • शिक्षक गुणवत्ता निधी सहभाग

    प्रत्येक वर्गात विविध क्षमता, रुची, गती असलेली मुले एकत्रित शिकतात. हे आव्हानात्मक काम पेलण्यासाठी शिक्षकांना सतत शिकत राहून आपली जाण प्रगल्भ करता यावी यासाठी शिक्षक गुणवत्ता निधी सहभाग किमान रु. 5000/-

  • स्थायी निधी सहभाग

    सर्व मुलांच्या जीवनावश्यक क्षमता विकसित होण्यासाठी प्रत्येक मुलाला संधी मिळावी, तसेच मागे पडणाऱ्या मुलांसाठी विशेष आखणी करता यावी, यासाठी वर्गातील मुलांची संख्या मर्यादित व शिक्षकांचे प्रमाण जास्त असते. ही प्रयोगशीलता जपता येण्यासाठी स्थायीनिधीत यशाशक्ती सहभाग.

  • शाळेच्या प्रयोगशीलतेला पाठिंबा

    शाळेच्या प्रयोगशीलतेला तुमचा प्रतीकात्मक पाठिंबा म्हणून प्रतिदिन किमान दहा रुपयांप्रमाणे रु. 3650/- दरवर्षी

आयकाराच्या 80 जी च्या नियमानुसार देणग्यांना सवलत उपलब्ध आहे

 

आपला बहुमोल धनादेश (चेक) ‘ ना.ग. नारळकर फाऊंंडेशन ‘ या नावाने काढावा. 

 

Online देणगीसाठीचे तपशील शाळेला संपर्क केल्यावर कळवण्यात येतील. 

अक्षरनंदन प्राथमिक शाळा: 020-25632224
अक्षरनंदन माध्यमिक शाळा: 020-25437513

अक्षरनंदन मोबाईल: +91 9421976079