26 जानेवारी 2025 रोजी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन आणि क्रीडादिन साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून Lend a hand या संस्थेचे श्री. सचिन खोडदे यांना आमंत्रित केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत व झेंडा गीत सादर करण्यात आले. सचिन दादांनी त्यांच्या भाषणात Lend a hand या त्यांच्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली.
यानंतर पहिली ते नववीच्या मुलांनी अनेक प्रकारच्या खेळांची प्रात्यक्षिकं मोठ्या उत्साहाने सादर केली.
या सर्व क्रीडा प्रकारात संघभावना, लवचिकता, दमश्वास, संपूर्ण शरीराचे संतुलन, एकमेकांना सहकार्य अशी अनेक कौशल्य पणाला लागली होती. मुलांनी या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये हिरिरीने आणि आनंदाने सहभाग घेतला. कार्यक्रम बघण्यासाठी आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांचे पालक माजी विद्यार्थी तसेच शाळेचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.