पावसात भिजतांंना

दरवर्षी मोठ्या गटाची मुले शाळेत त्यांच्या वर्गमित्र मैत्रिणींबरोबर तसेच ताईंबरोबर पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतात. पावसाच्या सरींमध्ये भिजणे, साचलेल्या पाण्यात लोळणे, उडया मारणे, पाणी एकमेकांच्या अंगावर उडवणे तसेच झालेल्या चिखलात आरामात बसून मातीच्या काही वस्तू करणे असे करत असतात. मुलांचे भिजणे झाले की त्यांना अंघोळ घालून, त्यांचे आवरून देण्यासाठी शाळेतील इतर वर्गांच्या ताई मदतीला येतात. नंतर मुलांना गरम गरम कॉफी प्यायला मिळते. बहुतेक मुलांचा कॉफी पिण्याचा हा पहिलाच अनुभव असतो. या वर्षी हा उपक्रम नुकताच शाळेत झाला.