शाळेत दरवर्षी पालकांसाठी तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. यावर्षी जानेवारी महिन्यात, तिसरी ते सहावीच्या पालकांसाठी अनुजा कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. अनुजा कुलकर्णी या समुपदेशक आहेत, तसेच शाळेच्या पालकही आहेत. शाळेत आत्ता शिकणारी मुलं Gen A या पिढीतील आहेत. या पिढीची वैशिष्ट्ये, त्यांच्याबरोबर वागताना, वावरताना येणारी आव्हाने, त्यांच्याकडे बघताना आपण आपल्या दृष्टिकोनात काय बदल करावा याबद्दल त्यांनी मांडणी केली. या मुलांना हाताळण्यासाठी पालकांना तसेच शिक्षकांनाही उत्तम मार्गदर्शन मिळाले.