वाहतुकीचे नियम याबाबत मुलांशी बोलणे केल्यानंतर शाळेजवळच्या चौकात जाऊन मुलांनी वाहनांचे निरीक्षण केले. चारचाकी वाहने, दोनचाकी वाहने किती होती याचा अंदाज बांधला. कोणी वाहतुकीचा नियम मोडला का ह्याबाबतही निरीक्षण करण्यास मुलांना सांगितले.
मुलांनी केलेले हे निरीक्षण मग चित्र काढून व एकूण वाहनांची संख्या याचा अंदाज बांधून कागदावर नोंदवले.
मुलांनी केलेल्या एकंदरीत अंदाजाचा आलेख फळ्यावर काढला. त्यावरून दोनचाकींची संख्या सगळ्यात जास्त होती हे मुलांना कळले.