दरवर्षी इयत्ता चौथी नाट्य वाचनाचा कार्यक्रम सादर करते. यावर्षी हा कार्यक्रम गुरुवार दि. 21 मार्च रोजी तिसरीची मुलं, ताई व चौथीच्या पालकांसमोर पार पडला. ‘अति तिथे माती’, ‘भातुकली’, ‘पंपू आजारी आहे’, ‘सळो की पळो’, ही चार निखळ आनंद देणारी नाटकं मुलांनी निवडली होती. योग्य शब्दफेक करत, आवाजाच्या चढउतारासह वाचन केल्याने प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंगाचं चित्र उभं राहिलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी फलकावर मुलांनी कागदावर काढलेली नाटकांची चित्रंं लावल्याने छान वातावरण निर्मिती झाली होती. मुलांच्या या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली तयारी- जसे स्टुलं लावणे, सतरंज्या घालणे, खुर्च्या ठेवणे मुलांनीच केली होती.