मराठी भाषा दिन

27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन. या निमित्ताने तिसरी ते सहावीच्या मुलांशी शाळेच्या संस्थापक सदस्या वंदनाताई भागवत यांनी संवाद साधला. शब्दांची भाषा आणि शब्दांखेरीजची भाषा कशी, कशासाठी, याबद्दल गप्पा मारल्या. लय, गेयता, शब्दांवरचे आघात, आशयातील गंमत, ध्वनी यामुळे किती मजा येते, ऱ्हस्व-दीर्घामुळे चाल कशी बदलते, यासाठी जुन्या कविता म्हणून दाखवल्या व मुलांनाही म्हणायला सांगितल्या.

सातवी ते दहावीच्या मुलांशी शाळेचे पालक ऋषिकेश दाभोळकर यांनी बोली भाषेचे महत्त्व आणि भाषेचे संवर्धन याविषयी संवाद साधला. मुलं या संवादात आनंदाने व उत्साहाने सहभागी झाली.

अगदी कमी वेळात भाषेच्या विविध अंगांना स्पर्श करणारे हे दोन्ही संवाद मुलांना भाषेकडे बघण्याची नवीन दृष्टी देऊन गेले.