ना. ग. नारळकर फाऊंंडेशन

पुण्यातील नु. म. वि.  प्रशालेचे मुख्याध्यापक ना.ग. नारळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उद्योजकतेला व उपक्रमशीलतेला चालना देण्याच्या उद्दिष्टाने १९८९ मध्ये ना.ग. नारळकर फाऊंंडेशन ची स्थापना झाली.

पुण्यातील नु. म. वि.  प्रशालेचे मुख्याध्यापक असताना केवळ सहा वर्षात (१९३६ ते १९४२) नाना नारळकरांनी शाळेचा कायापालट केला. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या ठायी स्वदेश व स्वभाषा प्रेम निर्माण केले. त्यांच्यातील उपक्रमशीलतेला वाव देऊन ज्ञानलालसा जागी करून त्यांच्या मनाची क्षितिजे रुंदावली. मुलांमधील व शिक्षकांमधील गुण हेरून, त्यांना नवनवे उपक्रम करण्यास उत्तेजन दिले. त्यांनी शिक्षक हा मध्यवर्ती घटक मानला.

स्वाभाविकपणे असा वारसा लाभलेल्या फाऊंंडेशनची सुरुवात शिक्षकांची जाणीव अधिक प्रगल्भ करणाऱ्या त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या गुणवर्धक शिबिरांनी झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वेच्छा येणारे शिक्षक ही या शिबिरांची खासियत होती.

उपक्रमातील शिक्षकांना जाणवणाऱ्या अनेक अडचणींना उत्तरे शोधण्याच्या निकडीतून अक्षरनंदन शाळेचा जन्म झाला. पूर्वतयारी म्हणून मुलांसाठी विविध विषयांना आणि माध्यमांना जोडणारी प्रकल्प शिबिरे घेतली गेली. भाषा व विज्ञान केंद्रे चालवली गेली.

वंचित गटातील मुलांसाठी शिबिरे, पूरक वर्ग ह्याच्या जोडीला शेती, आहार, आरोग्य, ऊर्जा या व सलग्न  विषयांमध्ये पर्यावरणीय दृष्टी व जीवनशैली यांचा परिपोष करणारे वैकल्पिक केंद्र उभे करण्याच्या दिशेने फाऊंंडेशनच्या कार्याचा भविष्यात विचार करण्याची कल्पना आहे.

डॉ. शामला वनारसे (अध्यक्ष) –  मानसशास्त्रीय कला केंद्राच्या संचालिका, राष्ट्रसेवा दलाच्या सैनिक, कला समीक्षक

श्री. प्रमोद नारळकर –  अभियांत्रिकी पदवीधर (आय.आय.टी), वास्तुनिर्मिती क्षेत्रातील नामवंत उद्योजक

डॉ. अनुराधा नारळकर – एम.डी. बालरोग तज्ञ

श्री. सुरेंद्र ब्रह्मे – सी.ए., वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात समाजकार्य

श्री. अलोक गोळे – केटरिंग व्यवसाय

सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या विविध व्यवसायांमधील व्यक्ती अक्षरनंदनच्या उभारणीसाठी एकत्र आल्या.
विद्या पटवर्धन  – सचिव नारळकर फाऊंंडेशन
वर्षा सहस्त्रबुद्धे  – प्रथम मुख्यध्यापक
गौरी देशमुख – प्रथम उप-मुख्यध्यापक
वसंत पळशीकर
वंदना भागवत
सुहास कोल्हेकर

संजीवनी कुलकर्णी
सरिता पुंगलिया
कमलाकर वाकणकर

डॉ. शामला वनारसे  – अध्यक्ष
विद्या पटवर्धन – नियामक मंडळ सदस्य व कार्यवाहक
वंदना भागवत – नियामक मंडळ सदस्य
गौरी देशमुख – नियामक मंडळ सदस्य
डॉ. सुहास कोल्हेकर
हेमा होनवाड

समीर शिपूरकर
प्रशांत कोठडिया
अमिताभ खरे 
जयदीप कर्णिक

रश्मि पंडित – मुख्याध्यापक
लारा पटवर्धन – शैक्षणिक व प्रशासकीय संयोजक
कामाक्षी मंत्री – बालवाडी पर्यवेक्षक
श्रुती काळे  – पहिली ते तिसरी पर्यवेक्षक
वैदेही मराठे – चौथी ते सहावी पर्यवेक्षक
अनघा बिवलकर – सातवी ते दहावी पर्यवेक्षक
अरुंधती तुळपुळे – सदस्य
मनिषा जाधव – सदस्य
मेधा चिकोडे – सदस्य
अनुजा नागवडे – सदस्य
जयश्री बाफना – सदस्य