अक्षरनंदन शाळेतल्या काही पालकांच्या पुढाकाराने शाळेमध्ये ’अक्षरनंदन फिल्म क्लब’ जून महिन्यात स्थापन झाला आहे. बालवाडी ते दहावीची मुलं या क्लबचे सदस्यत्व घेऊ शकतात. या क्लबचा पहिला कार्यक्रम ची ’अक्षरनंदन चित्रपट महोत्सव’ शनिवार सात जून आणि रविवार आठ जून या दिवशी पार पडला या महोत्सवात ’माय नेबर तोतोरो’ आणि ’व्हेअर इज फ्रेंड्स हाऊस’ असे जागतिक कीर्तीचे चित्रपट व काही लघुपट दाखवण्यात आले.