बालवाडी सहल - कमला नेहरू उद्यान

डिसेंबर महिन्यात छान थंडी पडली होती. बालवाडीच्या मुलांची सहल कमला नेहरु बागेत गेली होती. मोकळ्या वातावरणात मुलांनी खूप धमाल मस्ती केली. बागेतील विविध साधनांवर तसेच हिरवळीवर मुले मनसोक्त खेळली. नंतर मुलांची अंगत पंगत बसली आणि हसत खेळत , गप्पा मारत मुलांनी खाऊ खाल्ला.