वसाहतवादी शिक्षणाच्या सावटातून भारतीयांचे मन मुक्त व्हायचं तर त्यांनी स्वभाषा, संस्कृती आणि

 

सुंदर लोक परंपरांकडे पुन्हा एकदा वळायला हवे असे रवींद्रनाथ टागोर यांनी मांडले.

 

खऱ्या अर्थाने वैश्विक व्यक्तिमत्व भरण्यासाठी माणसाचीपाळेमुळे आपल्या भाषिक व सांस्कृतिक मातीत रुजलेली हवीत.

 

 

 

 

वसाहतवादी शिक्षणाच्या सावटातून भारतीयांचे मन मुक्त व्हायचं तर त्यांनी स्वभाषा, संस्कृती आणि सुंदर लोक  परंपरांकडे पुन्हा एकदा वळायला हवे असे रवींद्रनाथ टागोर यांनी मांडले. खऱ्या अर्थाने वैश्विक व्यक्तिमत्व भरण्यासाठी माणसाची पाळेमुळे आपल्या भाषिक व सांस्कृतिक मातीत रुजलेली हवीत.

 

 

 

मुलांच्या आंतरिक क्षमतांवर विश्वास टाकणारी, शिक्षण जीवनस्पर्शी करू पाहणारी शाळा.

आज माहिती व तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहे, साधन-सुविधांची भरभराट झालेली आहे. तरी माणसाचे जीवन स्वस्थ, समाधानी नाही; उलट त्याची वाटचाल आत्मघातकी व विध्वंसक ठरत आहे.

भारंभार माहिती आणि अधिकाधिक तंत्रज्ञान यांनी प्रश्न सुटणार नाहीत. आज गरज आहे ती मुलांच्या वृत्ती-विकासाला दिशा देणाऱ्या, त्यांच्यातील विवेक व शहाणपण जागवणाऱ्या शिक्षणाची. प्रत्येक मुलाचे व्यक्ती-विशेष जपणारे आणि तरीही त्यांना निसर्गाशी, समाजाशी आणि स्वतःशीही आत्मीयतेने जोडणारे संस्कार हे खरे शिक्षण.

स्वस्थ आणि संपन्न मानवी समाजाच्या धारणेत जबाबदारीने सहभागी होण्यासाठी आवश्यक अशी मूल्यंं, ज्ञान व कौशल्यंं शिक्षणातून आत्मसात व्हायला हवीत.

 


यावर आमचा विश्वास आहे


शिकणं शिकवणं

शासकीय अभ्यासक्रम व मान्यता यांची चौकट अक्षरनंदनने स्वीकारली आहे. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाठ्यपुस्तक हे एक महत्त्वाचं संसाधन आहे. पण मुलांचे शिकणं कोणत्याच टप्प्यावर केवळ ‘पुस्तकबंद’ व ‘परीक्षाभिमुख’ राहू नये यासाठी मुलांना विविध शैक्षणिक अनुभव दिले जातात. या अनुभवांंतून मुलांचं शिकणं अधिक आनंददायी व अर्थपूर्ण व्हावंं, महत्त्वाची जीवनमूल्यंं त्यांच्यामध्ये रुजावीत म्हणून आवर्जून प्रयत्न केले जातात.

स्वभाषेच्या माध्यमातून आणि आजूबाजूच्या पर्यावरणातून मूल शिकतंं तेव्हा शिकणं सहजपणे घडतंं. शिकलेल्या गोष्टी व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनतात. म्हणूनच अक्षरनंदनचे माध्यम मराठी आहे.

अक्षरनंदनमध्ये परीक्षा असते पण गुणाानुक्रम काढून हुशार-ढ असे शिक्के मारण्यासाठी नाही. खरंंतर ‘परीक्षा’ केवळ मुलांची नसतेच; शिकणंं-शिकवणंं प्रक्रियेतून मुलांपर्यंत काय काय आणि किती पोहोचलंं याचीही चाचणी मूल्यमापनाच्या प्रक्रियेतून होते.