अक्षरनंदन शाळेचा इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा वर्षोत्सव हा परफॉर्मिंग आर्ट्सवर आधारित एक सर्जनशील उपक्रम आहे. नृत्य, नाट्य आणि चित्रकला अशा विविध कलामाध्यमांतून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना, भावना आणि विचार व्यक्त करण्याची संधी या महोत्सवातून मिळते.
यंदाच्या वर्षोत्सवाचा विषय होता ‘खिडकी’. या विषयाचे विविध पैलू उलगडत चारही इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आपल्या कलाकृतींतून विषयाचे वेगवेगळे पैलू मांडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सांघिक प्रयत्नांना आणि अभिव्यक्तीला या महोत्सवातून सुंदर व्यासपीठ मिळते. यंदा इयत्ता नववीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आणि शाळेची माजी विद्यार्थिनी आणि नृत्य क्षेत्रात कार्यरत मैथिली सेवेकरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
