आपलं लहान मूल शाळेत जाते, शिकू लागतं हे पाहणे पालकांसाठी निश्चितच आनंददायी असते. मात्र मूल शाळेत जाऊन नक्की काय करते? कोणत्या कृती करून पाहते? डबा कुठे बसून खाते? हे सर्व पालकांना देखील अनुभवता यावे तसेच यामुळे मुलाची शिकण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येते. पालकांना काही तासांसाठी लहान मूल बनायची संधी देणारी ही कार्यशाळा एक आनंददायी अनुभव ठरतो.