महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड चे मुख्य सल्लागार आणि AI तज्ञ डॉ. विवेक सावंत सर यांची शाळेतील सर्व शिक्षकांसाठी ‘AI आणि शिक्षण क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सावंत सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सोप्या भाषेत AI बद्दल शिक्षकांना समजावून सांगितले. शिक्षकांना काही उपयोगी पडतील अशी AI टूल्स वापरायला शिकवली. AI बाबत धसका न घेता अथवा त्याची भिती न बाळगता रोजच्या शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियेत त्याचा कसा वापर करून घेता येईल हे सांगितले. या कार्यशाळेची काही क्षणचित्रे.