पुस्तकांपलीकडील जग समजून घेणारे, जिज्ञासू आणि सजग नागरिक घडवणे हा अक्षरनंदनच्या शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी शाळेत ‘चालू घडामोडी’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.देश-विदेशातील महत्त्वाच्या घटना, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा, अर्थकारण आणि समाजजीवनाशी संबंधित विषय विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वयोगटाला अनुरूप पद्धतीने मांडले जातात.वर्तमानाशी जोडून शिकण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.