तीनही विभागांची संमेलने नुकतीच सादर झाली. एखादा मध्यवर्ती विषय घेऊन तो विविध अंगांनी उलगडून दाखवणे, समजून घेणे अशी आपल्या संमेलनांची खासियत आहे.
22 डिसेंबर 24 रोजी सातवी ते दहावी चे संमेलन झाले. विषय होता बदल.
24 डिसेंबर 24 रोजी तीसरी ते सहावी चे संमेलन झाले… मुमकिन है l एक सलग कथानक आणि रेकॉर्डेड गाणी न वापरता मुलांनी प्रत्यक्ष (live) केलेले गायन आणि वादन हे या संमेलनाचे वैशिष्ट्य होते.
8 फेब्रुवारी 25 रोजी बालवाडी ते दुसरीचे संमेलन झाले.. रंगूया रंगात
मुलांनी त्यांच्या संमेलनाचे विषय विविध बाजूंनी समजून घेतले, त्यावर गप्पा मारल्या, लेखन केले, रंगमंचावरील वावर, आवाजातील चढउतार, शब्दफेक, पाठांतर, मोकळ्या हालचाली, प्रेक्षकांसमोर आत्मविश्वासाने सादरीकरण करणे… अशा अनेक गोष्टी मुलं शिकली.