‘संविधान रुजवताना’ या विषयावर सातवी ते दहावीच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी राजश्रीताई तिखे यांना शाळेने आमंत्रित केले होते. त्यावेळी राजश्रीताईंनी संविधानातील सांस्कृतिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय, सामाजिक मूल्ये, इत्यादी मुद्द्यांवर आपले विचार मांडले. व्याख्यानाची सांगता प्रश्नोत्तरांनी झाली.