दुकानजत्रा २०२४

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुकानाजत्रा हा उपक्रम उत्साहात पार पडला. तिसरी ते सहावीच्या मुलांची दुकान‌जत्रा शनिवार दि. २४ ऑगास्ट रोजी झाली. वस्तू बनवणे, पदार्थ बनवणे व विकणे यामध्ये तिसरी ते सहावीच्या प्रत्येक मुलाचा सह‌भाग होता. चौथीची मुले दुकानदार होती. त्यांना अक्षरनंदन या लुटूपुटीच्या बँकेतून खरे खरे कर्ज मिळाले. कर्ज, व्याज, जामीनदार, नफा, तोटा, सवलत अशा सर्व शब्दांचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवातून मुले शिकली. दुकान थाटणे, आपल्या दुकानावर असलेल्या वस्तूंची नीट माहिती देणे, हिशेब करणे, नंतरची आवरा आवर यामध्ये सर्व मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. शाळेतील सर्व उपक्रमांत पालकांची मदत खूप मोलाची असते. तसेच यावर्षीही तिसरी ते सहावीच्या पालकांनी मनापासून मदत केली. तिसरी ते सहावीची मुले, बालवाडी ते सहावीच्या सर्व ताई, दादा, पालक यांच्यामुळे हा उपक्रम ठरवल्याप्रमाणे उत्तम प्रकारे पार पडला.