लोकशाहीमध्ये नेता निवडीची प्रक्रिया कशी होते, त्या वेळी मतदारांची जबाबदारी व अधिकार काय असतात याचा अनुभव मुलांना मिळावा म्हणून वर्ग प्रतिनिधी निवडणूक होते.
याही वर्षी पाचवीच्या पुढील वर्गांमध्ये वर्ग प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया झाली.
प्रथम आवाजी मतदानातून चार मुली व चार मुलगे असे आठ उमेदवार निवडले गेले. या उमेदवारांनी आपापलं निवडणूक चिन्ह ठरवलं. त्यानंतर मतपत्रिका तयार झाली. उमेदवारांनी वर्गासमोर प्रचाराचं भाषण केलं.
1 जुलै रोजी पाचवी व सहावीच्या वर्गात गुप्त मतदान झालं. प्रत्येक वर्गात दोन मुली व दोन मुलगे वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आले.
आता दर आठवड्याला या सर्व प्रतिनिधींची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत त्यांना येणाऱ्या अडचणी, वर्गाचे प्रश्न याबाबत ताईंशी बोलणं होत आहे.
वर्ग प्रतिनिधींना नेमून दिलेली कामं सुरळीतपणे सुरू झाली आहेत.