विज्ञान कार्यशाळा

28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन. त्यानिमित्तानं मार्च महिन्यात इयत्ता आठवीसाठी आपले माजी पालक रवी गोडबोले यांनी भौतिकशास्त्राची एक दिवसाची कार्यशाळा घेतली.
विषय होता Automata.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक यंत्रं पाहतो, वापरतो. या सगळ्यात एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे त्यात होणारी चाकांची हालचाल. या हालचालींचा वापर करून मुलांनी खेळणं बनवायचं, ज्याला म्हणतात यांत्रिक खेळणी उर्फ Automata.
चार रबराच्या गोल चकत्या, स्ट्रॉ, काड्या यांच्या सहाय्यानं आपण निवडलेल्या विषयानुसार रचना करून वर-खाली आणि गोलाकार अशा दोन प्रकारच्या हालचाली वापरून मुलांना गटामध्ये  खेळणी तयार करायची होती. 
आपण निवडलेल्या थीमनुसार हालचाली होण्यासाठी मुलांना बरेच प्रयत्न करावे लागले. काहींना मात्र पटकन जमले. एकमेकांची मदत घेत, झालेल्या चुका दुरुस्त, करत मुलांनी आपली खेळणी पूर्ण केली.