लैंगिकता शिक्षण कार्यशाळा

इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी 28, 29 व 30 मार्च या कालावधीत लैंगिकता शिक्षण कार्यशाळा झाली. प्रयास संस्थेच्या मैत्रेयी कुलकर्णी आणि डॉ. शिरीष दरक यांनी ही कार्यशाळा घेतली.
विद्यार्थ्यांची शाळेबाहेरील वाटचाल सुरू होताना लैंगिकतेचे विविध पैलू समजून घेऊन, त्याबाबत योग्य दृष्टिकोन घेऊन जगात वावरण्यासाठी मुलं सिद्ध असावीत या दृष्टीने ही कार्यशाळा झाली.
निकोप नातेसंबंध म्हणजे काय, नात्यांमधील परस्पर संवाद कसा हवा, त्यातील सीमारेषा काय आहेत, नकार द्यावा कसा, स्वीकारावा कसा, आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तयार आहात का, अशा अनेक विषयांवर या कार्यशाळेत बोललं गेलं. फिल्म्स, क्विझ, वेगवेगळे खेळ, चित्र काढणं, चर्चा अशा विविध माध्यमातून हे विषय मुलांनी समजून घेतले.