१५ ऑगस्ट २०२४

या वर्षीही स्वातंत्र्यदिनाचा सोहळा, उत्साहाने पार पडला.
मुलांना ओळीत, शिस्तीत उभे राहता यावे यासाठी आदल्या दिवशीच माध्यमिकच्या मुलांनी मैदानाची साफसफाई करुन; फक्की मारुन नेटकी आखणी करुन ठेवली होती. लागणारे इतर साहित्य, वाद्य यांचीही जमवाजमव करुन ठेवली होती.

सागरमित्र श्री बोधनकर ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
राष्ट्रगीत, ध्वजगीत, झाल्यानंतर मुलांनी काही गाणी सादर केली.

● पहिली, दुसरीच्या मुलांनी- निसर्गाचे वर्णन करणारे ‘आमुचा बाग ‘ हे गाणं म्हटले.
● तिसरी ते सहावीच्या मुलांनी –
‘हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा ‘
हे गीत सादर केले.
● सातवी ते दहावीच्या मुलांनी – वसंत बापट ह्यांनी लिहिलेले
‘ जय भारत वर्ष महान ‘ हे गीत सादर केले.
प्रत्येक गाणं सादर करण्याआधी मुलांनी गाण्याचा अर्थ उलगडून सांगणारी प्रस्तावना केली. जी मुलांनी स्वतःच्या भाषेत लिहिली होती.

गाणी सादर झाल्यानंतर प्रमुख पाहुणे श्री.बोधनकर यांनी सागरमित्र या संस्थेच्या कामाबद्दल अतिशय मोलाची माहिती सांगितली आणि प्लॅस्टिक recycling च्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

दरवर्षी प्रमाणे ह्या सोहळ्यात, मुलांबरोबर पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही माजी विद्यार्थीही आवर्जून आले होते.