१० वी कौतुक समारंभ २०२५

अक्षरनंदन शाळेच्या दहावीच्या २५ बॅचचा कौतुक समारंभ ५ जून २०२५ रोजी उत्साह आणि आनंदात पार पडला.
त्यावेळी मुलांच्या मनात शाळेबाहेरील जगात पाऊल ठेवतानाची उत्सुकता आणि गेली दहा – बारा वर्षे ज्या शाळेत आनंदाने घालवले ती शाळा सोडतानाचे दुःख असे संमिश्र वातावरण होते.

शाळेच्या मुख्याध्यापक रश्मिताई यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यावेळी त्यांनी मुलांचे कौतुक व अभिनंदन करून या बॅचची वैशिष्ट्ये सांगितली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समीर शिपूरकर यांची ओळख करून दिल्यानंतर कार्यक्रमाची पुढील सूत्रे त्यांनी दहावीतील गार्गी आणि मल्हार यांच्याकडे सोपवली.

त्यानंतर शाळेने मुलांसाठी लिहिलेल्या कौतुक पत्राचे वाचन झाले. शुभेच्छा पत्राचे वाटप मुलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले गेले.

त्यानंतर अनघा ताई, किमया ताई आणि निरंजन दादा यांनी या बॅचविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले.

नंतर समीर शिपूरकर यांनी मुलांच्या वाढीत शिक्षकांच्या सहभागाचे महत्त्व विशद करून अक्षरनंदन शाळेतील शिक्षकांचा मुलांशी वेळोवेळी होणार संवाद, शाळेतील व शाळेच्या बाहेरील वातावरण यांमध्ये असणार तफावत यांविषयीचे विचार निरनिराळ्या विचारवंतांची उदाहरणे देऊन मांडले.

त्यानंतर त्या बॅचमधील काही मुले व काही पालक यांनी शालेय प्रवासाबद्दलचे आपले विचार मांडले.

कार्यक्रमाची सांगता मेधाताईंनी केली त्यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

त्यानंतर खाऊचे वाटप मुले, शिक्षक आणि पालक यांना केले गेले.