१० वी कौतुक समारंभ २०२६

आठवणी, हशा, कौतुक आणि भरपूर शुभेच्छा अशा आनंदी वातावरणात इयत्ता १० वीचा कौतुक सोहळा साजरा झाला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं आणि त्यांच्या प्रवासाचं मनापासून कौतुक करण्यात आलं. शाळेच्या संस्थापक सदस्य डॉ.संजीवनी ताई कुलकर्णी यांनी मुलांचे कौतुक केले. शिक्षक, पालक आणि मित्रांसोबत हा खास क्षण साजरा करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.