बोलक्या भिंती

बोलक्या भिंती – फ्रेंच चित्रकार केसादी बरोबर

Alliance France बरोबर फ्रेंच भाषेसाठी जोडून घेणाऱ्या अनेक शाळा आहेत, त्यांच्या मार्फत फ्रेंच चित्रकार कासेदीने आपल्या शाळेच्या ८वी च्या मुलांना बरोबर घेऊन नवीन भित्तिचित्र अवघ्या दोन दिवसात तयार केले. या चित्रकाराला इंग्रजी नीट येत नव्हते आणि आपल्या मुलांना फ्रेंच अजिबातच समजत नव्हते, तरी मुलांनी शिक्षकांच्या मदतीने संवाद साधत हे काम पूर्ण केले. शेवटी चित्राची भाषा जागतिक आहे हेच खरं !! या सुंदर बोलक्या भिंतींचे आणि या प्रक्रियेचे फोटो !!