क्रीडा महोत्सव हा अक्षरनंदन माध्यमिक शाळेतील सर्वाधिक लोकप्रिय आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचा उपक्रम!!
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात इयत्ता सातवी ते दहावीचे विद्यार्थी प्रचंड उत्साहाने सहभागी झाले.
शाळेतील चार गटांमध्ये डॉजबॉल, कबड्डी आणि फुटबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा रंगल्या.मैदानावरचा उत्साह, आपल्या गटासाठी खेळण्याची जिद्द आणि मित्रांना प्रोत्साहन देण्याचा आनंद अनुभवायला मिळाला.
या महोत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, खिलाडूवृत्ती, शिस्त आणि परस्पर सहकार्याची भावना रुजते. क्रीडा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी केवळ स्पर्धा नव्हे, तर एकत्र येऊन खेळण्याचा आणि शाळेच्या आठवणी समृद्ध करण्याचा आनंदसोहळा!
