२६ जानेवारी २०२६

प्रजासत्ताक दिन / क्रीडादिन

प्रजासत्ताक दिन आणि शाळेत होणारी क्रीडादिनाची प्रात्याक्षिके हे समीकरण सर्वांच्या ओळखीचे झाले आहे. यावर्षी व्यस्त वेळापत्रक आणि परीक्षा यातून वेळ काढून सर्व मुलांनी त्यांच्या इयत्तेसाठी ठरवलेल्या खेळाचा सराव केला, आणि जोषात सादरीकरण केले. सर्व गटाला एकत्र घेऊन, खेळाचा पुरेपूर आनंद घेत, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या क्रीडादिनाची काही खास क्षणचित्रे !!

नवीन बांधकाम केलेल्या मजल्याचे उदघाटन

एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 या अवघ्या 9 महिन्यात शाळेने नवीन मजल्याचे बांधकाम पूर्ण केले. चार प्रशस्त मोठे वर्ग (निर्मिती-अवकाश-भाषा केंद्र) आणि एक मोठा हॉल (विविधा) याचा समावेश असलेला हा चौथा मजला 26 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला. ना ग नारळकर फाउंडेशनचे विश्वस्त श्री प्रमोद नारळकर आणि कार्यवाह विदयाताई पटवर्धन यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. उदघाटन कार्यक्रमाचे खास क्षण!!