दुकानजत्रेची तयारी

रोजच्या व्यवहारातून मुलांना हिशोबाचे ज्ञान मिळावे, एकत्र गटात काम करून मुलांनी एका प्रकल्पाचे अथ पासून इति पर्यंत नियोजन करावे आणि तो प्रकल्प पार पाडावा यासाठी शाळेकडून दरवर्षी 3-6वी च्या विद्यार्थी वर्गांसाठी दुकानजत्रा हा उपक्रम भरवला जातो. वस्तू बनवण्यात चारही इयत्तांचा समावेश असला तरी दुकानजत्रेची मुख्य धुरा चौथीच्या मुलांच्या खांद्यावर असते. या मध्ये दुकानजत्रेच्या आदल्या काही दिवसातील तयारीची क्षणचित्रे आहेत. यामध्ये वस्तू बनवण्यापासून दुकान थाटण्यापर्यन्त चे काही महत्वाचे क्षण टिपलेले आहेत. हा उपक्रम शाळेच्या सर्वात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे.