दुकानजत्रा २०२५ - २०२६

दुकानजत्रा प्राथमिक : तिसरी ते सहावी

इ ४थी ला जीवन कौशल्ये शिकवणारा, मन-मनगट-मेंदू चा मिलाफ असणारी दुकानजत्रा सर्वांचा लाडका उपक्रम!! भांडवल उभारणी ते नफा तोटा शिकवणारी दुकान जत्रा शाळेची ओळख बनली आहे. वस्तूंची निर्मिती केली ३री ते ६वीने आणि खरेदी करणारे आहेत त्यांचे उत्साही पालक. जत्रेची काही निवडक क्षणचित्रे!

दुकानजत्रा माध्यमिक : इयत्ता आठवी

१८ जानेवारी २०२६ रोजी आठवीची दुकानजत्रा झाली. दुकानजत्रेसाठी विक्रीयोग्य, सुबक, आकर्षक वस्तू तयार करणे, तोंडी हिशोब करणे, जमा-खर्च, नफा- तोटा यांचे भान येणे, गटकाम शिकणे, ग्राहकांशी परिणामकारक संवाद साधता येणे, खऱ्याखुऱ्या विक्रीचा अनुभव घेणे अशा अनेक गोष्टी दुकानजत्रेच्या निमित्ताने मुले शिकतात. दुकानजत्रेचा आनंद घेण्यासाठी ७ वी ते १० वी या वर्गातील मुलांचे पालक, सातवी ते दहावीची मुले, काही माजी विद्यार्थी व शाळेशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या.. यावर्षीची दुकानजत्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

दुकानजत्रा प्राथमिक

दुकानजत्रा माध्यमिक