चौथी नाटयवाचन
एका जागी बसून वाचिक अभिनयाच्या मदतीने प्रेक्षकांना नाटकाचा अनुभव देणारी चौथीची मुले !! नाटयवाचनाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मुले वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचतात, सराव करतात आणि एक संघ म्हणून नाटक सादर करतात. यावर्षी देखील मुलांनी या सर्व प्रक्रियेचा आनंद घेत चार नाटिका सादर केल्या.
इ. ६ वी भाषण स्पर्धा
मुलांना सकस स्पर्धेचा अनुभव मिळावा, त्यांनी स्पर्धेसाठी मनापासून तयारी करावी या हेतूने ही भाषण स्पर्धा आयोजित केली होती. सर्व मुलांनी उत्तम सादरीकरण केले.मुलांचे परीक्षण करून परीक्षकांनी अंतिम निर्णय दिला. पाच मुलांना प्रभावी भाषण केल्याबद्दल तर सहा मुलांना उत्तेजनार्थ म्हणून मुलांनी तयार केलेल्या वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
इ. ७ वी – काव्यवाचन उपक्रम
मुलांमध्ये कवितेची आवड निर्माण व्हावी, वेगवेगळ्या कवींची ओळख मुलांना व्हावी यासाठी काव्यवाचन उपक्रम घेण्यात येतो. मुलांनी त्यासाठी अनेक कविंच्या कविता वाचतात, त्यातून ताइंच्या मदतीने योग्य कविता निवडतात. यावर्षीदेखील मुलांनी कवितेचे उत्तम सादरीकरण केले.
आठवी कथाकथन
फेब्रुवारी २०२६ मध्ये आठवीच्या मुलांनी, जेष्ठ लेखिका वंदनाताई भागवत यांनी अनुवादित केलेल्या देशोदेशीच्या लोककथांचे गटात अभिवाचन केले. मुलांनी लोककथांचे गटात केलेले अभिवाचन हा त्यांच्या मराठीच्या एका उपक्रमाचा भाग होता..या कार्यक्रमात विषय शिक्षकांनीही अभिवाचन सादर केले. नंतर वंदनाताईंनी लोककथा, त्यांचे प्रकार, त्यांचे महत्त्व यांविषयी आपले विचार व्यक्त केले.
चौथी नाटयवाचन
इ. ६ वी भाषण स्पर्धा
इ. ७ वी – काव्यवाचन उपक्रम
आठवी कथाकथन