छोटा गट ते इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी आयोजित केलेला दोन दिवसीय आनंद मेळावा म्हणजे धमाल, मजा आणि आनंदाची पर्वणी! उत्सवी वातावरणात सजवलेल्या शाळेत मुलांनी गोष्टी, गाणी, विविध खेळ, पपेट शो आणि नाटुकल्यांचा मनसोक्त आनंद घेतला. हसत-खेळत, गात आणि गोष्टींच्या विश्वात रमून मुलांनी हे दोन दिवस आनंदात घालवले. या आनंदसोहळ्याची गोड सांगता झाली ती मुलांना दिलेल्या चविष्ट मोदकांच्या खाऊने!