सहावीमध्ये शिकणाऱ्या अर्जुन केतकर याने आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर (5895 मीटर, 19341 फूट) 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांनी अवघ्या अकराव्या वर्षी सर केले.
ही अभिमानास्पद कामगिरी पार पाडत अर्जुनने भारताचा तिरंगा आणि अक्षरनंदन शाळेचा ध्वज शिखरावर फडकवला.
एक वेळ अशीही आली होती की मोहीम अर्धवट सोडून परत येण्याची वेळ अर्जुनवर आली होती. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने हे शिखर सर केले. या कामगिरीबाबत अर्जुन चे खूप कौतुक आणि त्याला मोठी शाबासकी!!